ओवाळू आरती मदनगोपाळा जी की आरती
ओवाळू आरती मदनगोपाळा ।
श्यामसुंदरा गळा वैजयंतीमाळा ।।ध्रु।।
चरणकमल ज्याचे ति सुकुमार ।
ध्वजवज्राकुश ब्रीदाचे तोडर ।। १ ।।
ओवाळू आरती मदनगोपाळा….
नाभिकमल ज्याचे ब्रह्मचर्याचे स्थान ।
हृदयी पदक शोभे श्रीवत्सल छान ।। २ ।।
ओवाळू आरती मदनगोपाळा….
मुखकमल पाहता सुखिचिया कोटी ।
वेधले मानस हारपली दृष्टी ।। ३ ।।
ओवाळू आरती मदनगोपाळा….
जडित मुगट ज्याचा देदीप्यमान ।
तेणे कोंदले अवघे त्रिभुवन ।। ४ ।।
ओवाळू आरती मदनगोपाळा….
एका जनार्दनी देखियले रूप ।
पाहता जाहले अवघे तद्रूप ।। ५ ।।
ओवाळू आरती मदनगोपाळा….
श्रेणी : आरती संग्रह
Note :- वेबसाइट को और बेहतर बनाने हेतु अपने कीमती सुझाव नीचे कॉमेंट बॉक्स में लिखें व इस ज्ञानवर्धक ख़जाने को अपनें मित्रों के साथ अवश्य शेयर करें।